

मुंबई : मुंबईत दिवाळीची जोरदार तयारी सुरू असून, नागरिकांनी शुक्रवारी (ता. १७) बाजारांत खरेदीसाठी गर्दी केली होती; मात्र रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाल्याने नागरिक हैराण झाले. पश्चिम द्रुतगती मार्गापासून दादर टीटी सर्कलपर्यंत वाहनांच्या काही किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. त्यात नागरिक तासन्तास अडकून पडले. चालक आणि प्रवाशांनी यावर संताप व्यक्त केला.