अवजड वाहनांना ठाणे शहरात १८ तासांची प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. त्याचा परिणाम पनवेल, जेएनपीएच्या वाहतूक व्यवस्थेवर पडला असून वाहतूक कोंडीबरोबर चालक, वाहक, माथाडी कामगारांवर परिणाम झाला आहे. जेएनपीएतून उत्तरेकडील राज्यात आयात-निर्यात करण्यासाठी मालाची वाहतूक करणारे हजारो वाहने रोज ये-जा करतात.