Traffic
वसई : वसई-विरार शहर कोंडीच्या कचाट्यात सापडत आहे. नियोजनाअभावी वाहतूक व्यवस्था कोलमडत असल्याने प्रवासी त्रासले आहेत. वाहनांच्या प्रचंड रांगा, कामावर जाण्यास आणि घरी येण्यास उशीर, इच्छितस्थळी पोहोचण्यास येणारी अडचण डोकेदुखी ठरू लागली आहे. या समस्यांना कुणी वाली आहे का, असा सवाल सुजाण नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.