मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक कोंडी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक रायगड व तळ कोकणाला पसंती देतात. पर्यटक व चाकरमानी फिरण्यासाठी निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, नागाव, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर हे समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले आहेत. अष्टविनायक क्षेत्र असलेल्या पाली, महाडमध्येही भाविकांची गर्दी होत आहे. 

पाली : उन्हाळी सुट्ट्यांमुळे बरेचसे चाकरमानी आणि पर्यटक कोकणात निघाल्याने शनिवारी मुंबई-गोवा महामार्गावर सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबलचक रांगा लागल्या होत्या. खोपोली-पाली मार्गावरही कोंडी झाली होती. 

सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक रायगड व तळ कोकणाला पसंती देतात. पर्यटक व चाकरमानी फिरण्यासाठी निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, नागाव, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर हे समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले आहेत. अष्टविनायक क्षेत्र असलेल्या पाली, महाडमध्येही भाविकांची गर्दी होत आहे. 

रायगड, मुरूड-जंजिरा, कुलाबा व खंदेरी आदी किल्ल्यांवरही पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे या ठिकाणच्या हॉटेल, लॉज व इतर व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे. शनिवारी सकाळपासूनच माणगाव, कोलाड आदी ठिकाणी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. 
वडखळ, वाकण, कोलाड, इंदापूर, पाली फाटा आदी महामार्गावरील मुख्य नाक्‍यांच्या ठिकाणी वाहनांची गर्दी झाली होती. अनेकांनी चहा-नाश्‍ता घेण्यासाठी येथे आपल्या गाड्या थांबवल्या होत्या. 

Web Title: The traffic Jam on Mumbai Goa road