खारघर टोल नाक्याजवळ वाहतूक कोंडी

अमित गवळे
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

पाली - नवी मुंबई येथील खारघर टोल नाक्यावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर बुधवारी (ता.8) सकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. 

या मार्गावर खारघर पुलाजवळ खड्डे भरण्याचे काम सुरु होते त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली होती. पण एवढ्या छोट्या कामासाठी योग्य नियोजनाअभावी हकनाक वाहनांच्या लांब रांगा लागून कोंडी झाली होती. त्यामुळे अवघे दीड किमीचे अंतर कापण्यास पाऊण तास लागत होता. त्यामुळे वाहन चालक व प्रवासी यांची मोठी गैरसोय झाली होती.

Web Title: Traffic jam near Kharghar toll naka