
मुंबई : पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ नव्याने बांधलेला उड्डाणपुल नागरिकांसाठी खुला होऊन दीड महिना उलटून गेला आहे. या उड्डाणपुलामुळे स्थानिकांना दिलासा मिळण्याऐवजी पुलाच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागात सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या पुलामुळे वेळ आणि इंधन वाचण्याऐवजी अपव्यय होत आहे. वाहन चालकांची डोकेदुखी वाढली असून पुलाच्या तीन लेन केल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचा गोंधळ उडत आहे.