कल्याण - पत्रिपुलावर अवजड वाहन बंद पडल्याने वाहतूक कोंडी

रविंद्र खरात 
बुधवार, 3 एप्रिल 2019

कल्याण - कल्याण शिळफाटा रोड वरील पत्रिपुलावर आज बुधवारी ता 3 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजून 50 मिनिटाला एक अवजड वाहन बंद पडल्याने कल्याण शिळफाटा रोड, कल्याण वालधुनी पूल, स्टेशन परिसर मध्ये वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या. सर्व ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने कल्याण डोंबिवली कराना चांगलाच त्रास सहन करावा लागला. तब्बल चार तासाने वाहतुक कोंडी दूर करण्यात वाहतूक पोलिसाना यश आले. 

कल्याण शिळफाटा रोड वरील 104 वर्ष जुना पत्रिपुल तोडल्यानंतर प्रतिदिन त्या परिसरात वाहतूक कोंडी होत असून, आज बुधवार ता 3 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजून 50 मिनिटाला अवजड वाहन क्रमांक एम एच 06 - ए क्यू - 2337 हे अचानक पत्रिपुलावर बंद पडले. त्याचा डायव्हर चावी घेऊन पसार झाला आणि बंद पडलेल्या अवजड वाहनाला ओव्हरटेक करून वाहन चालक जाऊ लागले. पत्रिपुल परिसरात चांगलाच चक्का जाम झाला. कल्याण पूर्वेला पत्रिपुल ते कचोरे, पत्रिपुल ते कल्याण पश्चिम गोविंदवाडी रोड, बेलबाजार, वलीपिर रोड वर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

घटनेची माहिती मिळताच कल्याण पश्चिम वाहतूक शाखेचे पोलीस नाईक नामदेव हिमगिरे, कल्याण पूर्व वाहतुक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक साळुंखे यांनी वार्डन सोबत बंद पडलेले अवजड वाहन बाजूला करण्याचा प्रयन्त केला मात्र डायव्हर ने चावी नेल्याने गडबड झाली तो पर्यंत वाहतूक कोंडी वाढल्याने कल्याण पूर्व कडून क्रेन मागविण्यात आले. तरीही अवजड वाहन पुढे सरकत नसल्याने पोलीस नाईक यांनी कारागीर न मिळाल्याने स्वतः वाहनांच्या खाली जाऊन जाम झालेले टायरची समस्या दूर केली तब्बल एक तासाने म्हणजे 8 वाजून 15 मिनिटाला ते अवजड वाहन कल्याण पूर्वच्या दिशेने वाहतूक पोलिसांना यश आले. मात्र यामुळे कल्याण शिळफाटा रोड, कल्याण पश्चिम वालधुनी पूल, कल्याण मुरबाड रोड कर्णिक रोड, आदी परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक पोलिसाना चांगलाच घाम फुटला. घटनेची माहिती मिळताच कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गँभिरे यांनी आपल्या पथकसमवेत वालधुनी पुलाजवळ धाव घेत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयन्त केला त्यांना ही वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी दोन तास लागले. सकाळी साडे दहा वाजता पत्रिपुल आणि वालधुनी पुलावर वाहतूक सुरळीत झाली. यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

Web Title: traffic jam at patripul kalyan