esakal | मुंबईत दिवाळीच्या खरेदीला ट्रॅफिक जामचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत दिवाळीच्या खरेदीला ट्रॅफिक जामचा फटका

दक्षिण मुंबईत खरेदीस येताना आणि जाताना मोठ्या वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ट्रॅफिक जामच्या त्रासाने संथ वाहतूक आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्यास लोकांचा ओघ कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबईत दिवाळीच्या खरेदीला ट्रॅफिक जामचा फटका

sakal_logo
By
दिनेश चिलप मराठे

मुंबईः  यंदा कोरोनामुळे दीपावली जरी साधेपणाने साजरी करण्याचे सरकारी आवाहन असले तरी ही लोकांना दिवाळ सणानिमित्त दोन दिवसावर आलेल्या दिवाळी खरेदीस उत्साह पाहायला मिळतोय. दक्षिण मुंबईत खरेदीस येताना आणि जाताना मोठ्या वाहतूक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ट्रॅफिक जामच्या त्रासाने संथ वाहतूक आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्यास लोकांचा ओघ कमी होत असल्याचे दिसून येत आहे. तरीही काही उत्साही मात्र याही परिस्थितीत दिवाळीच्या खरेदीस सरसावलेले आहेत.

क्रॉफर्ड मार्केट समोरच मनीष मार्केट आहे. येथे इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य मिळते. मोबाईल ते लॅपटॉपचे अक्सेसरिज मिळते इथेही खरेदीस आलेल्या लोकांना पाहता येते.  काळबादेवी येथील स्वदेशी मार्केट,एमजे (मूलजी जेठा) मार्केट, मंगलदास मार्केट येथे आणि परिसरात तयार कपडे, रेडिमेड, होजियरी गारमेंट्स खरेदीस महिलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.

मेट्रो फॅशन स्ट्रीट तसेच कुलाब्यातील कॉजवे फॅशन स्ट्रीट येथेही सायंकाळी खरेदीस गर्दी जमल्याचे. जामा मशीद तसेच पोलिस आयुक्त कार्यालय समोरील लोहार चाळ परिसरात विविध आकारांचे कंदील, इलेक्ट्रिक तोरण माळा, सजावट साहित्य घेण्यास तरुणांची गर्दी झालेली दिसत आहे.

अधिक वाचा-  न्यूज रुममध्ये पोहोचल्यावर अर्णब गोस्वामींकडून मुख्यमंत्र्यांना आव्हान
 

वर्षाचे बाराही महिने वाहतूक समस्यांनी ग्रासलेल्या दक्षिण मुंबईतील जे.जे. मुख्य सिग्नल पासून ते मिनारा मशीद, इसाभाई फटाकेवाला सिग्नल पर्यंत वाहतूक समस्या फार मोठी असल्यामुळे वाहनांचा वेग मंदावत असतो. बेशिस्तपणे पार केलेल्या दुतर्फा वाहनांमुळे या समस्येत अधिकच भर पडते. येथून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस तसेच भायखळा पर्यंत जाणाऱ्या वाहनांना जेजे फ्लायओव्हर हा एक उत्तम पर्याय असला तरीही आजकाल फ्लाय ओव्हरही ट्रॅफिक जाम पाहायला मिळतो.

त्याचप्रमाणे वरून खालून जाणारा सीएसटीकडे जाणारा मार्ग दिवसभर वाहतुकीने गजबजलेला असतो. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते भायखळा दादरपर्यंत जाणारा ही मार्ग वाहतूक समस्येमुळे संत झाल्याचं नेहमीच पाहायला मिळतो.

दक्षिण-मुंबई ही मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मश्जिद बंदर येथे धान्य बाजार त्याचप्रमाणे होलसेल मार्केट तेल- किराणा मार्केट, मसाला मार्केट आहेतच येथे खरेदीसाठी लोकांची नित्याची येत असते. तसेच काळबादेवी या परिसरामध्ये असलेली स्वदेशी मार्केट, एमजे मार्केट, मंगलदास मार्केट प्रमाणे क्रॉफर्ड मार्केट मनीष मार्केट मुसाफिरखाना मोहम्मद अलीरोडला लागून असलेली लहान मुलांचे त्याचप्रमाणे मोठ्यांच्या कपड्यांचे होलसेल दुकान आहेत. मोहम्मद अली रोडच्या शेजारी जाणाऱ्या आणि मुंबादेवीला मिळणारा मार्ग येथे असणारे सराफा बाजार डायमंड मार्केट भुलेश्वर फुल बाजार त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय विविध बँकांची विविध आस्थापनांची कार्यालय येथे नित्याचीच गर्दी असते.

एक रविवार सोडला तर आठवड्यातील काही दिवस या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू असते. त्याचे मूळ आणि मुख्य कारण म्हणजे शिस्तपणे वाहनचालकांना द्वारे चालविण्यात येणारी वाहन, दुचाकी वाहन, लहान चारचाकी वाहन जसे मिळेल तिथे जो तो मनमानी पद्धतीने जात येत असतो.

अधिक वाचा-  बाजारपेठांमधली गर्दी पाहून दिवाळीत पालिकेसमोर कोविड रोखण्याचे आव्हान

लोकल बंद असल्याने दिवाळ सणातही लोकांचे हाल होतायत. लोकांना मर्यादित स्वरुपात लोकल प्रवासाची परवानगी असावी जेणेकरुन रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी करता येईल. कारण एखादा एकटाच खरेदीला आला तरी चारचाकी वाहन वापरतो हे थांबायला पाहीजे. कॉफ्रर्ड मार्केट, पायधुनी, नळ बाजार, मुंबादेवी, काळबा देवी, झवेरी बाजार येथे वाहन पार्किंग सोय नसल्याने लोक जमेल तेथे वाहन पार्क करून निघून जातात. त्यामुळे वाहन कोंडी होते, असे दक्षिण मुंबई राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सलीम खतींब यांचे म्हणणे आहे.

दक्षिण मुंबईतील जे जे हॉस्पिटल मेन सिग्नल चौक ते मिनारा मस्जिद  सिग्नल ते मोहम्मदली रोड इसाभाई फटाके वाला सिग्नल या भागात वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण होतो. अवजड वाहने म्हणजेच मोठे कंटेनर्स, हेवी गुड्स लॉरी ट्रक येथे येत नाहीत नाहीतर या तापात आणखी प्रचंड भर पडली असती.

खाजगी वाहने, बसेस, टॅक्सी, दुचाकी, माल वाहक हातगाडी, रस्त्यालगत पार्किंग केलेली वाहने यांच्यामुळे मुख्य मार्गावर जागाच कमी उरते. त्यात मलाच आधी जायचे ही अहमहिक़ा असल्याने मनाला वाटेल तसे वाहन चालक वाहने चालवितात.
 
कमालीचा संयम पाळत आम्ही वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य अविरत करीत असतो, वाहन चालकांनी शिस्तीने वाहने चालविल्यास ट्राफिक जामची समस्या काही प्रमाणात कमी होईल. वाहनांची वाढलेली संख्या तसेच दिवाळी खरेदीस होत असलेली गर्दीही काही प्रमाणात कारणीभूत आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

-----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Traffic jams hit Diwali shopping in Mumbai