खड्ड्यांमुळे विरार मध्ये वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा 

विरार वाहतूक कोंडी
विरार वाहतूक कोंडी


विरार ः वसई विरार शहरात सध्या वाहतुक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. वसई पूर्व पश्‍चिम ब्रिजवर रोज गर्दी होत असतानाच आता विरार पूर्व पश्‍चिम ब्रिजवरही वाहनांची कोंडी होऊ लागली आहे. रोज सायंकाळी सात वाजताच सुमारास विरार फ्लायओव्हर ब्रीजवर वाहनांची गर्दी होवून वाहतूक कोंडी होते. जवळपास तीन किमी लांब वाहतुक कोंडीचा सामना येथील वाहनचालकांना करावा लागत होता. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे ही कोंडी होत असल्याचा आरोप वाहन चालक करत आहेत. 


सध्या लॉकडाउन उठवल्याने सायंकाळच्या सुमारास कामावरुन, तसेच काही कामासाठी वाहनातून जाणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी शहरातील प्रमुख रस्त्यावर होत आहे. एका बाजूला रेल्वे बंद असल्याने सर्व ताण हा रस्ते वाहतुकीवर येत आहे तर दुसऱ्या बाजूला विरार ते हायवे पर्यंतच्या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडल्याने त्यामुळेही वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहन चालकांना त्रास तर होत आहेच पण वाहनांचीही नुकसान होत आहे. त्यातच सध्या अँम्ब्युलन्स ही शहरातून मोठ्या प्रमाणात रुग्णांना घेवून ये-जा करत असतात. या वाहतुक कोंडीचा फटका रुग्णांना ही भेडसावत आहे.

विरार मध्ये वीर सावरकर मार्ग, पूर्व पश्‍चिम जोडणार ब्रीज, चंदनसार नाका, वसईत वालीव नाका, रेंज ऑफीस तर नालासोपाऱ्यात तुळींज, आचोळे येथे प्रचंड वाहतुक कोंडीचा फटका वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. सायंकाळच्या सुमारास वाहतुक पोलीस नसल्याने वाहतुक कोंडी होत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. 



विरार पूर्व स्टेशन ते शिरसाद फाटा (मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग) या दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहतुकीची कोंडी तर होत आहेच पण दुसऱ्या बाजूला गाडी चालवताना त्रास होतो. खड्ड्यांमुळे गाडीचे नुकसान होत आहे. यावर तातडीने उपाय योजना करायला हव्यात 
                            किरण कीर्तने , विरार 

खड्डे भरण्याचा ठेका देण्यात आला असून पाऊस असल्याने ते काम थांबले होते. आता खड्डे भरायचे काम सुरु करण्यात आले आहे. 
              राजेंद्र लाड, बांधकाम अभियंता, वसई-विरार, महापालिका 

 Traffic jams in Virar due to potholes

(संपादन ः रोशन मोरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com