कल्याणमधील रिक्षा चालकांना वाहतूक पोलिस आणि आरटीओचा दणका

kalyan
kalyan

कल्याण - कल्याण पश्चिममधील दिपक हॉटेल ते साधना हॉटेल या रस्त्याच्या दोन्ही बाजूने रिक्षानी जागा व्यापल्याने सर्व सामान्य नागरिकाला रेल्वे स्थानक गाठताना चांगलीच दमछाक होते. तर कोंडीने वाहन चालक ही त्रस्त होती यातून सुटका व्हावी बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईची मागणी वाढली होती. याची दखल घेत आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या विशेष पथकाने अचानक रिक्षा चालकांवर धडक कारवाई

मध्ये 234 रिक्षांची तपासणी करत 30 रिक्षा चालकांना नोटीस देत 20 रिक्षा जप्त करण्यात आल्या. या धडक कारवाईने बेशिस्त रिक्षा चालकांनी स्टेशन परिसरामधून पळ काढल्याने स्टेशन परिसर मोकळा झाला होता. 

या परिसरात एकीकडे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा स्टँड असताना रस्त्यावर रिक्षा उभ्या करून वाढीव भाडे घेणे, भाडे नाकारणे, गणवेश न घालणे, लायसन्स नसणे, चौथे सीट घेणे, आदी तक्रारी होत्या. हे पाहता काही दिवसांपूर्वी कल्याण आरटीओ कार्यालयामध्ये वाहतूक पोलिस आणि आरटीओ अधिकारी वर्गाच्या बैठका झाल्या मात्र कारवाई कधी असा सवाल केला जात होता? आज मंगळवार ता 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कल्याण पश्चिममधील दिपक हॉटेल ते साधना हॉटेल परिसरात कारवाई करण्यात आली.

कल्याण आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक प्रवीण कोटकर, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौतम गंभीरे, पोलीस उप निरीक्षक दिपक भोई, पोलिस उपनिरीक्षक प्रज्ञा देशमुख, ही कारवाई केली. या कारवाईमुळे बेशिस्त रिक्षा चालकांचे धाबे दणाणले होते. अनेक रिक्षा चालकांनी आपल्या कारवाई टाळण्यासाठी आपल्या नेत्यांना फोन केला. मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्याने कारवाईला सामोरे गेले. तर अनेकांनी तेथून पळ काढल्याने रस्ता मोकळा झाला.


वाहतूक कोंडी, रिक्षा चालकांच्या बाबतीत तक्रारी पाहता आज आरटीओ सोबत कारवाई सुरू केली असून, यापुढे सुरू ठेवणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि रिक्षा चालकांनी कागद पत्र सोबत ठेवावे असे आवाहन वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com