
Rickshaw and Taxi Drivers
ESakal
मुंबई : मोटार वाहन कायद्यानुसार रिक्षा व टॅक्सीचालकांना गणवेश अनिवार्य आहे, मात्र अनेकदा चालक गणवेश परिधान न करताच वाहने चालवितात. त्यांना गणवेशाचा विसर पडल्याचे चित्र आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांच्या २०२४च्या अहवालानुसार ५० हजार अशा रिक्षा, टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.