
मुंबई : गोकुळाष्टमी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून राज्यभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहीहंडी हा या सणातील प्रमुख आकर्षण असून यानिमित्त गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत गोकुळाष्टमी आणि दहीहंडी सणानिमित्त प्रशासनाकडून उपाययोजना लागू केल्या आहेत. अशातच या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.