
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवर कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. मेट्रोच्या कॉक्रीट खांबांवर तुळया (गर्डर) ठेवण्याची कामे करण्यात येणार आहेत. 11 ते 30 ऑगस्ट या कालावधीत 3 टप्प्यात ही कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी कल्याण शीळ रोडवर रात्री पावणे बारा ते पहाटे पाच वाजेपर्यत वाहतूक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे.