
Traffic police Action
ठाणे : शहरातील प्रमुख चौकांमध्ये चालकांकडून वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. विशेषतः दुचाकी आणि रिक्षा चालवणारे चालक नियमांची पायमल्ली करत असून, त्यामुळे इतर शिस्तबद्ध चालक आणि पादचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे सर्व प्रकार अगदी वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत घडत असून, नियमभंग करणाऱ्यांची संख्या इतकी मोठी आहे की प्रत्येकावर कारवाई करणे प्रत्यक्षात अशक्य ठरत आहे.