
माथेरान : माथेरान येथे फिरण्यासाठी आलेले नवी मुंबईचे तीन युवक पोहण्यासाठी शारलोट तलावात उतरले असता, ते बुडाल्याची घटना रविवारी (ता. १५) घडली. रात्री उशिरा तिघांचे मृतदेह हाती लागले. सुमित चव्हाण (वय १६), आर्यन खोब्रागडे (१९) आणि फिरोज शेख (१९) असे मृतांची नावे आहेत.