ST Car Accident
sakal
मुरबाड - मुरबाड-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, मंगळवारी सकाळी वैशाखरे गावाजवळ एसटी बस आणि कारच्या धडकेत चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर आहेत. १३ एप्रिलला या मार्गावर रायते येथे झालेल्या अपघातात ११ जणांंचा बळी गेला होता. या दुर्घटनेला एक महिना होण्यापूर्वीच पुन्हा भीषण अपघात झाल्याने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.