esakal | ट्रेन राजस्थानसाठी, अफवा बिहार ट्रेनची... दोन हजार मजूरांनी मांडला ठिय्या
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रेन राजस्थानसाठी, अफवा बिहार ट्रेनची... दोन हजार मजूरांनी मांडला ठिय्या

पालघर स्थानकातून बिहारसाठी मंगळवारी दुपारी बिहारसाठी ट्रेन सुटणार असल्याची अफवा अचानक पसरली आणि गर्दी जमण्यास सुरुवात झाली. पालघर पोलिसांनी याचवेळी ट्वीटरवरुन दुपारी दोन वाजता पाली राजस्थानसाठी ट्रेन सुटणार असल्याचे ट्वीट केले. 

ट्रेन राजस्थानसाठी, अफवा बिहार ट्रेनची... दोन हजार मजूरांनी मांडला ठिय्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः पालघर स्थानकातून बिहारसाठी मंगळवारी दुपारी बिहारसाठी ट्रेन सुटणार असल्याची अफवा अचानक पसरली आणि गर्दी जमण्यास सुरुवात झाली. पालघर पोलिसांनी याचवेळी ट्वीटरवरुन दुपारी दोन वाजता पाली राजस्थानसाठी ट्रेन सुटणार असल्याचे ट्वीट केले. 

लक्षण नसलेल्या कोरोनाबाधितांना 10 दिवसात घरी पाठवणार, पालिकेकडून अंमलबजावणी सुरु

बोईसरला बिहारसाठी ट्रेन सुटणार असल्याची अफवा पसरली होती, त्याचवेळी वसई रेल्वे स्थानकातून पाली (राजस्थानला) ट्रेन सुटणार असल्याची चर्चा सुरु झाली. याबाबत पालघर पोलिसांनी दुपारी साडेबाराला ट्वीट करुन दुजोरा दिला. त्यांनी दुपारी दोन वाजता ही ट्रेन सुटणार असल्याचे सांगितले.

मद्य खरेदीसाठी आता 'इ-टोकन'; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा निर्णय

दरम्यान, मंगळवारी दुपारी पालघर स्टेशनहून बिहारसाठी ट्रेन सुटणार असल्याची अफवा पसरली. अनेक पुरुष, महिला तसेच अनेकांनी आपल्या मुला-बाळांसह तारापूर विद्यामंदीरात गर्दी करण्यास सुरुवात केली. तिथे वैद्यकीय चाचणी होणार. त्यानंतर बसने तेथून पालघरला नेणार असे त्यांना वाटत होते. सोमवारी पालघरहून जौनपूरला दुपारी ट्रेन सुटली होती तसेच मंगळवारी होणार हा त्यांचा विश्वास होता. 

गावी जायंचय मग, 'ई-पास' मिळवण्याची प्रक्रिया जाणून घ्या

या गर्दी केलेल्या काहीजणांकडे इ-पासेस होते, तर काहींना सोमवारी ज्या प्रमाणे ग्रामसेवकांनी हे पासेस मिळवून दिले तसेच मंगळवारी मिळतील हा विश्वास होता. त्यांच्यापैकी अनेक जण एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे संकेत पाळत नव्हते. त्यांच्यातील अनेकांना मंगळवारीही ट्रेन सुटणार असल्याचा विश्वास होता. त्यांना शांत करण्यात आम्हाला अखेर यश आले असे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांनी शाळेच्या मैदानात गर्दी केलेल्या दोनहजारांपैकी कोणाविरुद्धही गुन्हा दाखल न करण्याचे ठरवले आहे, पण त्याचवेळी हा चूकीची माहीती कोणी पसरवली याचा शोध सुरु केला आहे. आणि सकाळपासून बोईसरमधील शाळेत अनेकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारची कोणतीही श्रमिक एक्सप्रेस सुटणार नाही असे सांगितल्यावरही दोन हजार जणांनी ठिय्या मांडला आहे.