ग्रामविद्युत व्यवस्थापकासाठी सप्टेंबरपासून प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

मुंबई - ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत स्तरावर विद्युतविषयक सेवा तातडीने उपलब्ध व्हाव्यात आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे वीज पुरवठ्यासंदर्भातील प्रश्न लवकर सुटावेत म्हणून महावितरणतर्फे ग्रामविद्युत व्यवस्थापक ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी आवश्‍यक असणारे प्रशिक्षण एक सप्टेंबरपासून सुरू करावे, अशी सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणाला दिली. या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण भागातील 23 हजार आयटीआयधारकांना रोजगाराची संधी प्राप्त होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशिक्षणाचा कालावधी एक महिन्याचा असेल.
Web Title: Training for the Village Electrifier Manager from September