राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! मुंबईची कायदा व सुव्यस्था नागरे-पाटलांकडे

अनिश पाटील
Wednesday, 2 September 2020

कोरोनामुळे रद्द केलेल्या सर्वसामान्य पोलिस दलातील बदल्यांना 15 टक्के मंजुरी देताच राज्य सरकार अणि पोलिस महासंचालक यांच्यातील वादात सापडलेल्या बदल्यांना अखेर मुहुर्त मिळाला.

मुंबई : कोरोनामुळे रद्द केलेल्या सर्वसामान्य पोलिस दलातील बदल्यांना 15 टक्के मंजुरी देताच राज्य सरकार अणि पोलिस महासंचालक यांच्यातील वादात सापडलेल्या बदल्यांना अखेर मुहुर्त मिळाला. त्यानुसार, गृहमंत्रालयाने पहिल्या टप्प्यातील वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.

बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश; मुंबईतून एकाला अटक 

मुंबईच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह-पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक येथे नियुक्ती झाली आहे.  तर, नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा व सुव्यवस्था विभागाच्या सह आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.  मिलिंद भारंबे यांची मुंबई  गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. 26/11च्या हल्ल्यात जखमी झालेले पोलिस अधिकारी सदानंद दाते यांची मिरा-भायंदर, वसई-विरार येथील पोलिस आयुक्तपदी आणि नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह नियुक्ती करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालक असलेले आशुतोष डुंबरे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. 

 

मध्य मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दक्षिण विभागाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी सत्यनारायण चौधरी आणि पुर्वविभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी संजय दराडे यांची नियुक्ती करण्यात आली.
कोल्हापुच्या विशेष पोलिस महानिरिक्षकपदी मनोज लोहीया तर, सुहास वारके यांची राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागपदी नियुक्ती करण्यात आली. पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना आहे त्याच पदावर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे, या दोन प्रमुख शहरांत नवे पोलिस आयुक्त येणार नाहीत.
पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदी कृष्णप्रकाश आणि नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. 

मनोजकुमार लोहिया यांच्याकडे कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रताप दिघावकर यांची नाशिक परीक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.    अमरावतीच्या आयुक्तपदी नाशिकच्या अधीक्षक आरतीसिंह यांची नियुक्ती तर, मुंबईच्या गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक यांची पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली आहे. 

मिरा-भाईंदरकरांना कर माफी नाहीच ; आयुक्तांची भुमिका ठरली महत्त्वाची - 

बदल्यांची यादी
1) अपर पोलिस महासंचालक(विशेष अभियान), राजेंद्र सिह-अपर पोलिस महासंचालक(कायदा व सुव्यवस्था)
2) अपर पोलिस महासंचालक(लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), आशुतोष डुंबरे- आयुक्त(राज्य गुप्तवार्ता विभाग)
3) सह आयुक्त(राज्य गुप्त वार्ता विभाग) अमितेष कुमार-पोलिस आयुक्त नागपूर शहर(पदोन्नती)
4) अपर पोलिस महासंचालक(रेल्वे मुंबई) जय जीत सिंग-अपर पोलिस महासंचालक(लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)
5) सहपोलिस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) विनयकुमार चौबे-अपर पोलिस महासंचालक(लाचलुचपत प्रतिंधक विभाग)
6) सदानंद दाते(केंद्रीय नियुक्ती)-पोलिस आयुक्त, मीरा भाईंदर
7) पोलिस आयुक्त (नागपूर शहर) भूषणकुमार उपाध्याय-अपर पोलिस महासंचालक(वाहतुक)
8)पोलिस आयुक्त(नवी मुंबई) संजय कुमार- अपर पोलिस महासंचालक(प्रशिक्षण व खास पथके)
9)अपर पोलिस महासंचालक(लाचलुचपत प्रतिबंधक विभाग)बीपीन कुमार सिंग-पोलिस आयुक्त नवी मुंबई
10)एटीएस प्रमुख देवेन भारती-पद नाही
11) अपर पोलिस महासंचालक(वाहतुक) विनय कारगावकर- त्याच पदावर पदोन्नती
12) आयुक्त(राज्य गुप्तवार्ता विभाग)रश्मी शुक्ला -नागरी संरक्षण संचालक(नवे पद)(पोलिस महासंचालक श्रेणीचे)
.....
1)विशेष पोलिस महानिरीक (सागरी व विशेष सुरक्षा)यशस्वी यादव- सहपोलिस आयुक्त(वाहतुक), मुंबई
2)मुंबईचे सह पोलिस आयुक्त(वाहतुक)मधुकर पांडे-विशेष पोलिस महानिरीक सागरी व विशेष सुरक्षा
3) विशेष पोलिस महानिरीक्षक(सुधारसेवा)दिपक पांडे -नाशिक पोलिस आयुक्त
4)नवी मुंबई सह पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर-सहपोलिस आयुक्त(प्रशासन),मुंबई
5) विशेष पोलिस महानिरीक्षक(नाशिक परिक्षेत्र) छेरिंग दोरजे- विशेष पोलिस महानिरीक्षक(सुधारसेवा)
6) विशेष पोलिस महानिरीक्षक(नांदेड) मनोज लोहिया- विशेष पोलिस महानिरीक्षक(कोल्हापूर परिक्षेत्र)
7) विशेष पोलिस महानिरीक्षक(महिला आत्याचार प्रतिबंध)प्रताप दिघावकर- विशेष पोलिस महानिरीक्षक(नाशिक परिक्षेत्र)

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfers of senior police officers in the state! Mumbai's law and order to Nagre-Patla; Ashutosh Dumbare is the head of the state intelligence department