असंसर्गजन्य आजाराच्या जनजागृतीसाठी तृतीयपंथीयांसाठी शिबिर व कार्यशाळा | BMC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

असंसर्गजन्य आजाराच्या जनजागृतीसाठी तृतीयपंथीयांसाठी शिबिर व कार्यशाळा

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई :  तृतीयपंथी समुदायाला (transgender group) मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिका (bmc) प्रयत्नशील असल्याचे मत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी (suresh kakani) यांनी व्यक्त केले. असंसर्गजन्य आजाराबाबत (non infectious disease) तृतीयपंथीय समुदायासाठी जनजागृती शिबिर व कार्यशाळा (public awareness and workshop) विद्याविहार (पश्चिम) येथील जॉली जिमखानामध्ये बुधवारी संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

हेही वाचा: मलिक यांच्या विरोधात वानखेडेंचा पुन्हा हायकार्टोत मानहानीचा दावा

काकाणी म्हणाले की, आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारे अकारण त्रास न होता आपण आपल्या कामकाजाची निवड केली पाहिजे. आजाराविषयी मनामध्ये विविध कल्पना असतात. याबाबत आपण कोणता योग्य विचार करावा, कोणता करू नये, भ्रामक विचार कसे दूर करावेत, याविषयी मानसिक आरोग्याबाबत नुकतीच चर्चासत्रं देखील आयोजित करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. कुठलाही आजार हा वाईट नसतो. त्या आजारावर आपण कशा पद्धतीने मात करू शकतो, याविषयी विचार करून आपण त्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. तृतीयपंथी समुदायाने आपल्या कुठल्याही आजाराबाबत तपासणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये जाऊन, न घाबरता वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

मुंबई महानगरपालिकेचे डॉक्टर योग्य ते मार्गदर्शन करतील. संबंधित वैद्यकीय मंडळींवी विश्वास ठेवावा, असे आवाहनही काकाणी यांनी यावेळी केले. नवीन वैद्यकीय उपक्रम अंतर्गत आपण आमच्याकडे न येता, आम्ही आता आपल्यापर्यंत पोहोचत असून आपल्या गरजा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका योग्य त्या आत्मनिर्भर योजना तयार करत असल्याचे काकाणी यांनी यावेळी सांगितले. जेव्हा आपण एकत्रित येऊ, एकमेकांना सहकार्य  करु, त्यावेळी सर्व योजनांचा लाभ मिळू शकेल आणि महानगरपालिका प्रशासनालाही उपक्रम योग्य पद्धतीने राबवता येईल, असेही त्यांनी अखेरीस नमूद केले. या कार्यशाळेत समतोल आहाराचे महत्त्व, मधुमेह, मानसिक आरोग्य, व्यसन मुक्ती तसेच एच. आय. व्ही. व या आजारांबद्दल विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले.

loading image
go to top