तृतीयपंथींशी भांडण महागात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

मुंबई - धारावीत हळद समारंभाला आलेल्या तृतीयपंथीशी झालेले भांडण २४ वर्षीय तरुणाला महागात पडले. या तृतीयपंथीने केलेल्या तक्रारीवरून धारावी पोलिसांनी सुंदर हनुमंत या तरुणाला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. 

राजीव गांधीनगर येथे मित्राच्या हळदी समारंभासाठी रविवारी सुंदर गेला होता. त्या ठिकाणी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गेलेल्या सात तृतीयपंथींनी नाचण्यास सुरुवात केली. सुंदरने जाण्यास सांगितले असता, या तृतीयपंथींनी नकार दिला. त्यामुळे त्यांच्यात वाद आणि नंतर हाणामारी झाली. त्या वेळी या तृतीयपंथींनी पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला. त्यामुळे स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

सुंदरने चुकीच्या प्रकारे स्पर्श केल्याची तक्रार तृतीयपंथींनी केली. त्यामुळे पोलिसांनी सुंदरला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. तेथे विनयभंग व धमकावण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी भारतीय दंड विधानातील कलम ३५४ व ५०६(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

सुंदरची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Transgender quarrel