ऐकावं ते नवलंच ! खोकण्या-शिंकण्यापेक्षा बाधित गायकाच्या गाण्यातून अधिक पसरतो कोरोना

ऐकावं ते नवलंच ! खोकण्या-शिंकण्यापेक्षा बाधित गायकाच्या गाण्यातून अधिक पसरतो कोरोना

मुंबई : कोरोना संसर्गाबाबत नवनवे खुलासे समोर येत आहेत. बाधिताच्या शिंकण्या किंवा खोकण्यापेक्षा गाणं गाण्यातून विषाणूंचा अधिक प्रसार होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. त्यामुळे 'लाईव्ह कॉन्सर्ट्स' सारखे कार्यक्रम टाळायचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोना विषाणू रूग्णाच्या शिंकण्या, खोकण्या किंवा मोठ्याने बोलण्याने त्याच्या तोंडातून वेगाने निघतात. मात्र नव्या संशोधनानूसार गाणा-या व्यक्तीच्या तोंडातून निघणा-या विषाणूंमुळे संक्रमणाचा अधिक धोका अधिक असल्याचे समोर आले आहे. खासकरून गर्दीच्या ठिकाणी हे संक्रमण अधिक वेगाने पसरण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

ब्रिटनच्या सायन्टिफिक ऍडव्हायजरी ग्रृप ऑफ इमर्जन्सीने केलेल्या संशोधनानुसार संक्रमित व्यक्तींच्या गाण्यामुळे बोलणे किंवा खोकण्याच्या तुलनेत अधिक विषाणू एरोसोलच्या रूपात बाहेर पडतात. हे एरोसोल आसपासच्या लोकांसाठी घातक ठरू शकतात. शिवाय यामुळे अधिक तीव्र स्वरूपात विषाणूंची बाधा होऊ शकते. 

जगभरात सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणावर होते. अश्या ठिकाणी मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी मंचावर जर एखादा बाधित गायक गात असेल तर त्याच्या कडून विषाणूंची बाधा मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. इतकेच नाही तर अशा कार्यक्रमांना मोठी गर्दी होते शिवाय प्रेक्षक देखील गायकासोबत गाणं गात असल्याने बाधा अधिक होण्याची शक्यता आहे.

नव्या संशोधनामुळे गायक किंवा संगीतकारांना गाणं गात असतांना सावध राहण्याची गरज असल्याचे ही संशोधक सांगतात. शक्य असेल तर अश्या प्रकराच्या कार्यक्रमांना जाणे टाळणे महत्वाचे असल्याचे ही ते सांगतात.

( संपादन - सुमित बागुल )

transmission of covid virus is at higher rate when singer is singing as compared to speaking or coughing

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com