esakal | ठाण्यात शेअर रिक्षांवर वाहतूक विभागाचा कारवाईचा बडगा, 26 हजारांचा दंड वसूल
sakal

बोलून बातमी शोधा

ठाण्यात शेअर रिक्षांवर वाहतूक विभागाचा कारवाईचा बडगा, 26 हजारांचा दंड वसूल

सोमवारी एका दिवसात एक हजार 59 रिक्षांवर कारवाई करत 4 लाख 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी 26 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.

ठाण्यात शेअर रिक्षांवर वाहतूक विभागाचा कारवाईचा बडगा, 26 हजारांचा दंड वसूल

sakal_logo
By
राहुल क्षीरसागर

मुंबईः  कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग अहोरात्र काम करताहेत. तसेच राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यासंदर्भात वारंवार सूचना करताहेत. मात्र, या सूचना आणि आवाहनाला केराची टोपली दाखवत रिक्षात दोन पेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या रिक्षांवर ठाणे शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार सोमवारी एका दिवसात एक हजार 59 रिक्षांवर कारवाई करत 4 लाख 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. त्यापैकी 26 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.

राज्यात सध्या कोरोनाचा धोका असल्यामुळे अंतराच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे असून याबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारकडून वेळोवेळी जाहीर करण्यात आल्यात. या मार्गदर्शक सुचनांमध्ये एका रिक्षामधून केवळ दोन प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी ठाणे शहरातील शेअर रिक्षा चालक या नियमांचे  उल्लंघन करत असल्याचे प्रकार पाहायला मिळत आहे. ठाणे शहरातील कळवा, बाळकूम, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात शेअर रिक्षा चालतात. या भागातील सर्वच रिक्षा चालक सध्या एका रिक्षामध्ये पुढे दोन प्रवासी आणि मागे तीन अशा पाच प्रवाशांची वाहतूक करीत असल्याचे चित्र दिसून येते. 

रिक्षात जास्त प्रवासी भरण्यात येत असल्यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडविला आहे. या प्रकारामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक निर्माण झाला आहे. रिक्षात जास्त प्रवासी भरल्याबाबत एखाद्याा प्रवाशाने विचारणा केली तर त्याला रिक्षाचालकांकडून दमदाटी करण्यात येते.

अधिक वाचा-  लोकल ट्रेनमध्ये चोरीला गेलेले दागिने मिळाले तब्बल 20 वर्षांनी, महिलेकडून पोलिसांचे आभार

दरम्यान, ठाणे शहर वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेअंतर्गत 18 वाहतूक युनिटमार्फत करण्यात दोन पेक्षा अधिक प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात आली. सोमवारी एका दिवसात सर्वाधिक कारवाई कल्याण युनिटच्यावतीने करण्यात आली. त्याखालोखाल कोनगाव युनिटमार्फत 143 रिक्षांवर अशा एकूण एक हजार 59 रिक्षांवर कारवाई करण्यात आली असून 4 लाख 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला.  26 हजारांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.

अधिक वाचा-  बिहारमध्ये 'जंगलराज' संपून 'मंगलराज' येणार; बिहार निवडणुकांच्या निकालांवर संजय राऊतांची कमेंट

 कोरोनाच्या काळात रिक्षामध्ये अतिरिक्त प्रवासी भरले जात असल्याच्या प्रकार गंभीर आहे. यामुळे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडत असून अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच भविष्यात देखील ही कारवाई सुरूच राहणार आहे.

बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Transport department action against shared rickshaws Thane one day fine Rs 26 thousand recovered