लोकल ट्रेनमध्ये चोरीला गेलेले दागिने मिळाले तब्बल 20 वर्षांनी, महिलेकडून पोलिसांचे आभार

रविंद्र खरात
Tuesday, 10 November 2020

लोकल ट्रेनमध्ये एखादी वस्तू हरवली तर ती पुन्हा मिळण्याची अपेक्षा करु नये. मात्र तब्बल २० वर्षानंतर एका महिलेला तिचे दागिनं परत मिळाले आहेत. रेल्वे पोलिसांनी महिलेला तिचे दागिने सुपूर्द केलेत. दागिने परत मिळाल्यानं महिलेला खूप आनंद झाला असून तिनं पोलिसांचे आभार मानलेत.

मुंबईः  लोकल ट्रेनमध्ये एखादी वस्तू हरवली तर ती पुन्हा मिळण्याची अपेक्षा करु नये. मात्र तब्बल २० वर्षानंतर एका महिलेला तिचे दागिनं परत मिळाले आहेत. रेल्वे पोलिसांनी महिलेला तिचे दागिने सुपूर्द केलेत. दागिने परत मिळाल्यानं महिलेला खूप आनंद झाला असून तिनं पोलिसांचे आभार मानलेत.

कल्याण रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायली परदेशी ही महिला आपल्या कुटुंबासोबत कल्याण रेल्वे स्थानकमधून घाटकोपरला लग्नासाठी 18 मार्च 2000 रोजी जात होत्या. त्यावेळी एका महिलेने खाली काय पडले असे सांगत गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले होते. त्यानंतर याप्रकरणी त्या महिलेने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात 19 मार्च 2000 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अधिक वाचा-  राज्य सरकारकडून ST महामंडळाला एक हजार कोटींचे पॅकेज,अनिल परब यांची घोषणा

मात्र आता रेल्वे पोलिसांना 20 वर्षाने गुन्हा उघडकीस आणण्यास यश आले आहे. काही दिवसांपूर्वी महिला आरोपीला अटक करण्यात आले होते. न्यायालयाने दागिने परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कल्याण रेल्वे पोलिसांनी मुंबई मध्ये फिर्यादी महिलेचा शोध घेतला. मात्र ती महिला आळंदी येथे राहत होती.  तिचा शोध घेऊन आज मंगळवारी कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात बोलावून तिचे दागिने परत केले असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश देवरे यांनी दिली.  20 वर्षांनी दागिने परत मिळाल्यानं त्या महिलेने रेल्वे पोलिसांचे आभार मानलेत.

अधिक वाचा-  सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा; परिवहन मंत्र्यांना अटक करा, भाजप नेत्यांची मागणी

एका लग्न समारंभाला जात असताना 20 वर्षांपूर्वी लोकलने प्रवास करताना माझे दागिने चोरीला गेले होते. मी आशा सोडली होती. मात्र 20 वर्षाने दागिने मिळाल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया सायली परदेशी यांनी दिली.

------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

After 20 years of finding stolen jewelery in local train woman thanked police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After 20 years of finding stolen jewelery in local train woman thanked police