SSC-HSC Exam: परीक्षार्थींसाठी पोलिस सज्ज! वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांसाठी ५४ रायडर्स तैनात

Transport Department: वाहतूक कोंडीची समस्येमुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतूक विभाग सज्ज झाले आहे. वाहतूक विभागाने विद्यार्थ्यांसाठी ५४ रायडर्स तैनात केले आहे.
Police Riders will help exam candidates in traffic jams

Police Riders will help exam candidates in traffic jams

ESakal

Updated on

ठाणे शहर : ठाणे पोलिस आयुक्तालयातील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. वाहतूक विभागाने कोंडीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी ५४ रायडर्स तैनात केले आहे. गेल्या वर्षी परीक्षेच्या काळात या रायडर्सनी ३४ विद्यार्थ्यांची कोंडीतून सुटका करून त्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचवले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com