मुंबई : रिक्षा, टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने अॅप सुरु केले जाणार आहे. त्याचे रिक्षा टॅक्सी चालकांनी स्वागत केले आहे तर बाईक टॅक्सीला विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे बाईक टॅक्सीमुळे तरुणांना रोजगाराची संधी मिळेल अशी भूमिका दुचाकी चालकांनी मांडली आहे.