देशव्यापी संपाचा वाहतूकदारांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

मुंबई - डिझेल दरवाढीमुळे तोटा होत असल्याचा दावा करत देशभरातील वाहतूकदार 18 जूनपासून (सोमवार) बेमुदत संप पुकारतील, असा इशारा "ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ गुड्‌स व्हेहीकल ओनर्स असोसिएशन'ने (एसीओजीओए) गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

डिझेलचे वाढते दर, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये झालेल्या वाढीविरुद्ध हे आंदोलन होणार असल्याची माहिती ट्रक चालक-मालक संघटनेचे सरचिटणीस राजिंदर सिंग यांनी दिली. ते म्हणाले, 'वाहतूकदारांच्या समस्यांवर सरकार ठोस पावले उचलेल, या आशेवर आम्ही बराच काळ थांबलो होतो; मात्र या समस्या सोडविण्यास सरकारला रस नसल्याचे दिसत असल्याने आमच्यापुढे संप पुकारण्याशिवाय अन्य उपाय उरलेला नाही.'' डिझेलच्या दरात पाच महिन्यांत 17 टक्के वाढ झाली. त्या तुलनेत ट्रकच्या भाड्यांमध्ये वाढ झालेली नाही. इंधन दरवाढ मागे घेण्यात यावी, असे आवाहन आम्ही सरकारला करत आहोत, असेही ते म्हणाले.

Web Title: transporter strike warning diesel rate