वाघासाठी कुंबेट परिसरात सापळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

पिटसई, कुंबेट हा परिसर डोंगरांनी व्यापलेला आहे. फणसाड अभयारण्याचे क्षेत्र असल्याने ग्रामस्थांना वारंवार वन्यप्राण्यांचे दर्शन घडते. पिटसई येथील अशोक लोखंडे विद्यालयात कुंबेट येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी बिबट्या आणि वाघाचे दर्शन झाले होते. त्यामुळे त्यांच्या मनात दहशत आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. ग्रामस्थांनाही बिबट्याचे दर्शन झाले आहे. 

तळा : तालुक्‍यातील पिटसई शाळेतील विद्यार्थीसंख्या काही दिवसांपासून सातत्याने घटत आहे. शिक्षक चांगले शिकवत नाहीत, पोषण आहार मिळत नाही, असे कोणतेही कारण त्यामागे नसून चक्क वाघोबाच्या भीतीमुळे हे घडले आहे. शाळेत येत असताना विद्यार्थ्यांना वाघासारख्या हिंस्र प्राण्याचे दर्शन घडले होते. त्यामुळे ही भीती निर्माण झाली आहे. वन विभागाने त्याची दखल घेत आता कुंबेट परिसरात पिंजरा लावला आहे. 

पिटसई, कुंबेट हा परिसर डोंगरांनी व्यापलेला आहे. फणसाड अभयारण्याचे क्षेत्र असल्याने ग्रामस्थांना वारंवार वन्यप्राण्यांचे दर्शन घडते. पिटसई येथील अशोक लोखंडे विद्यालयात कुंबेट येथून येणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांपूर्वी बिबट्या आणि वाघाचे दर्शन झाले होते. त्यामुळे त्यांच्या मनात दहशत आहे. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. ग्रामस्थांनाही बिबट्याचे दर्शन झाले आहे. 

याबाबत त्यांनी वन विभागाला निवेदन दिले आहे. हिंस्त्र प्राण्यांच्यादहशतीचा परिणाम ग्रामस्थांच्या जीवनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरसुद्धा झाला असल्याने वन विभागाने त्यांना जेरबंद करण्यासाठी कुंबेट परिसरात पिंजरा लावला आहे.

कुंबेट गावामधून पिटसरी विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेणारे २० विद्यार्थी येतात. दोन ते तीन वेळा मुलांना वाघ व बिबट्या दिसल्याने पालकांनी मुलांना शाळेत पाठवणे बंद केले आहे.
- महादेव गोळे, सदस्य, अशोक लोखंडे हायस्कूल समिती 

वाघ आणि बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत वन खात्याला निवेदन दिले असता कर्मचारीवर्ग अपुरा असल्याचे कारण त्यांनी सांगितले. त्यामुळे दुर्घटना घडली तर याला वन खाते जबाबदार असेल.
- गणेश कातुर्डे, रहिवासी

कुंबेट, पिटसई हा परिसर जंगलाचा आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर असतो. या भागात  पिंजरा लावण्यात आला आहे. - विजय पाटील, वनपाल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trap in the Kumbet area for tigers