चालकाला डुलकी लागली तरी प्रवासी सुरक्षित 

चालकाला डुलकी लागली तरी प्रवासी सुरक्षित 

मुंबई - मुंबई मेट्रोच्या तीन टप्प्यांसाठी डबे पुरवण्याचे कंत्राट केंद्र सरकारच्या भारत अर्थ मूव्हर्स उपक्रमाला मिळाले आहे. पुढील दोन वर्षांत डबे पुरवण्यास सुरुवात होणार आहेत. विशेष म्हणजे तिन्ही टप्प्यांतील सर्व मेट्रो स्वयंचलित असल्याने चालकाला डुलकी लागली तरी प्रवासी सुरक्षित राहणार आहे. सुरुवातीला मेट्रो चालवण्यासाठी चालक असतील. नंतर मात्र टप्प्याटप्प्याने मेट्रो चालकाशिवाय धावण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएसआरडीसी) अंतर्गत दहिसर ते डी. एन. नगर, डी. एन. नगर ते मंडाले-मानखुर्द आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व अशा तीन मेट्रो मार्गांसाठी पूर्णपणे भारतीय बनावटीच्या असलेल्या 63 मेट्रोसाठी 378 डबे तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी तीन हजार 15 कोटींचा खर्च करण्यात येणार असून जपानची "हिताची' कंपनी तांत्रिक सहकार्य करणार आहे. सर्व डबे अत्याधुनिक स्वरूपाचे, वजनाने हलके, ऊर्जा कार्यक्षम आणि वातानुकूलित असतील. महत्त्वाचे म्हणजे मेट्रोसाठी चालकविरहित प्रणाली वापरण्यात आली आहे. त्यामध्ये दोन टप्प्यांतील मार्गावर चाचणी परीक्षणासाठी काही ट्रेन तयार करून दिल्या जाणार आहेत. यशस्वी चाचणीनंतर दर तीन महिन्यांनी 12 ट्रेन पुरवण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले. 

असे असतील मेट्रो डबे 
भारतीय बनावटीचे असलेले डबे 3.2 मीटर रुंदीचे आणि 25 किलोवॉट क्षमतेच्या विद्युत प्रणालीवर स्टॅण्डर्ड गेजवर कार्यरत राहणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अनअटेंडेड ट्रेन ऑपरेशन पद्धतीने मेट्रो चालणार असून दोन फेऱ्यांमध्ये केवळ 90 सेकंदांचे अंतर राखले जाणार आहे. मेट्रो रेल्वे कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल तंत्रज्ञानावर चालणार आहे. 

प्रवाशांसाठी अशा असतील सुविधा 
विशेष व्यक्ती, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधेसाठी मेट्रोचे डबे परिपूर्ण असतील. नव्या मेट्रोमध्ये सीसी टीव्ही, रुळांवर काही अडथळा असल्यास तो दूर करणारी यंत्रणा, प्रवाशांना वेळोवेळी माहिती देणारी यंत्रणा, प्लॅटफार्म स्क्रीन डोअर, आग नियंत्रक यंत्रणा आदी अनेक सुविधांचा समावेश आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com