दादाजी खोब्रागडेंना उपचारासाठी मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

मुंबई - तांदळाचे विविध वाण शोधणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांना वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केली आहे. नांदेड (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) येथील दादाजी रामाजी खोब्रागडे हे सध्या पक्षाघाताने आजारी असून, त्यांच्यावर ब्रह्मपुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन लाख रुपयांची मदत फडणवीस यांनी मंजूर केली आहे. खोब्रागडे हे उपचार घेतील, त्या रुग्णालयाच्या खात्यामध्ये आवश्‍यकतेनुसार ही रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही स्थानिक प्रशासनाकडून करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Web Title: treatment help to dadaji khobragade