चेंबूरमध्ये झाड कोसळले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

झाड कोसळल्याने तीन जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

चेंबूर : चेंबूरमधील पेस्टम सागर व जुना रेती बंदर परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मार्ग क्रमांक 6 वर 60 वर्षांपूर्वीचे जीर्ण झालेले पिंपळ-वड एकत्र असलेले झाड कोसळल्याने तीन जण जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

महेश उमेश पाथारकर (वय 7), विकास पंडित अल्हाट (वय 12) व शिवाजी लोंढे (वय 55) अशी जखमींची नावे आहेत. विकासच्या जबड्याला व तोंडाला मार लागला आहे. महेशला डोक्‍याला दुखापत झाली आहे. शिवाजी लोंढे यांच्या हाताला व चेहऱ्याला मार लागला आहे. झाड पडलेल्या मार्गावर गॅरेज आणि झोपडपट्टी विभाग असल्याने मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

दुपारी शाळेत जाण्यासाठी निघालेले महेश आणि विकास दुर्घटनेत जखमी झाले. 
दुपारी सव्वा बाराच्या सुमारास झाड कोसळले, तेव्हा मार्गावर वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे रहिवाशांनी सांगितले. अग्निशमन दल व टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी पोचून आडव्या पडलेल्या झाडाच्या फांद्या तातडीने बाजूला करून मार्ग रहदारीकरिता खुला केला. 

web title : The tree collapsed in Chembur

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tree collapsed in Chembur