

Mumbai Weather
ESakal
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मुसळधार पावसाने पायाभूत सुविधांबाबत महानगरपालिका आणि राज्य सरकारचे मोठे दावे उघडे पाडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरांमधील परिस्थिती बिकट होत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये झाडे पडण्याच्या घटना सर्रास घडत असतानाच, भांडुपमधील एक संपूर्ण रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेला आहे.