'मेडिकल'साठी वाढतोय विद्यार्थ्यांचा कल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी घेतलेल्या 'नीट' परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले. वैद्यकीय प्रवेशांसाठी 59 हजार 296 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्‍चित केले होते.

मुंबई : वैद्यकीय पदवी (एमबीबीएस व बीडीएस) अभ्यासक्रमांसाठी पहिल्या फेरीत 6391 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. त्यात एमबीबीएसचे 4854 आणि बीडीएसचे 1537 विद्यार्थी आहेत. यंदा जागा वाढवल्यानंतरही विद्यार्थ्यांमध्ये चुरस कायम राहिली आहे. 

वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी घेतलेल्या 'नीट' परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशाचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले. वैद्यकीय प्रवेशांसाठी 59 हजार 296 विद्यार्थ्यांनी अर्ज निश्‍चित केले होते. त्यापैकी राज्यभरातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेण्याची सुविधा 30 केंद्रांवर दिली होती. त्या केंद्रांवर 43 हजार 386 विद्यार्थ्यांनी पडताळणी करून प्रवेशासाठी प्रयत्न केले होते. 

एमबीबीएस आणि बीडीएसच्या जागा वाढल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला; परंतु खुल्या गटातील विद्यार्थ्यांमधील स्पर्धा कायमच आहे. राज्य आणि विभागांच्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत खुल्या गटातील अंतिम पात्र विद्यार्थ्यांच्या गुणांत (कट ऑफ) यंदा 50 ते 70 गुणांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मराठा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी व खुल्या गटातील विद्यार्थ्यांच्या गुणांतही मोठी तफावत आढळली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The trend of students rising for Medical faculty