लॉकडाऊन : उन्हाळी भाज्यांना बाजारपेठ न मिळाल्यानं आदिवासी शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

सध्या सर्वत्र लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका रसायनी पाताळगंगा परिसरातील उन्हाळी भाजी मळ्यावाले आदिवासी नागरिकांनाही बसला आहे.

रसायनी : सध्या सर्वत्र लागू असलेल्या लॉकडाऊनचा फटका रसायनी पाताळगंगा परिसरातील उन्हाळी भाजी मळ्यावाले आदिवासी नागरिकांनाही बसला आहे. लॉकडाऊनमुळे यंदा उन्हाळी भाजीच्या पिकांचे नुकसान झाल्याने हा वर्ग आर्थिक संकटात सापडला असून त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

नक्की वाचा :  उद्धव ठाकरेंना आला राज्यपालांचा फोन ; म्हणाले 'इथे भेटल्यावर ठरवू या वेळ'... 

रसायनी लगतच्या घेरा माणिक गड आणि कर्नाळा किल्ल्याच्या डोंगर रांगांतील वाड्यांमधील आदिवासी लोक रसायनीतील सिंचनाचा आधार असलेल्या ठिकाणी मोकळ्या जमिनीत किंवा शेतकऱ्यांच्या जमीनी भाड्याने घेऊन उन्हाळी मळे लावतात. त्यात काकडी, घोसाळी, शिरोळी, दुधी, कारली, मिरची, वांगी, पालक, कोथिंबीर आदी पालेभाजांचे पीक घेऊन आदिवासी बांधवांना चांगले पैसे मिळतात. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भाजीपाला तसाच पडून राहिल्याने तसेच भाजी बाजारही बंद असल्याने आदिवासींची मेहनत वाया गेली. त्यामुळे सुमारे 80 टक्के मळ्यावाले आदिवासींनी मळे सोडून आपले घर गाठले आहे. यंदाच्या हंगामावर पाणी सोडावे लागल्याने आदिवासी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. 

मोठी बातमी : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला सुरुवात

काकडी, शिरोळी, घोसाळी आदींचा मळा लावला होता,  त्यासाठी सुमारे पन्नास हजार रूपये खर्च आला. साधारण चार वेळा भाज्या तोडल्या मात्र लॉकडाऊनमुळे भाजीसाठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकली नाही. भाजीला प्रतिकिलो 3 ते 5 रूपये भाव मिळाल्याने उत्पादनाचा खर्चही मिळाला नाही. आता पुढील सहा महिन्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. 
-जानु निरगुडा, माडभवन आदिवासीवाडी

tribal farmers Financial planning collapsed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tribal farmers Financial planning collapsed