मुसळधार पावसामुळे झाडे घरांवर पडून आदिवासींच्या घरांचे नुकसान

अच्युत पाटील
गुरुवार, 5 जुलै 2018

बोर्डी (पालघर) : मुसळधार पावसासह आलेल्या वादळाच्या तडाख्याने बोरीगावला झाडे उन्मळून पडण्यासह आदिवासींच्या घरांचे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय योजून परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला.

बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु आहे. सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुसळधार पावसासह हे वादळ धडकले. त्याच्या तडाख्याने अनेक झाडे उन्मळून पडल्याने विद्युत तारा तुटलल्या आहेत. सीताराम नडगे यांच्या घरावर झाड पडून पत्रे फुटली. तर गणेश वळवी, बुधु वळवी, दत्तू शनवार आणि राजू सावे यांच्य घरांचे नुकसान झाले आहे. सदर घटना बुधवारी (ता. 4) घडली.

झाई-तलासरी जिल्हा मार्गावरील व. का. लाखाणी शाळेनाजीक रस्त्यावर पडलेले चिंचेचे झाड स्थानिकांनी हटविले. परिसरातील झाडे उन्मळून पडल्याने विद्युत तारा तुटल्याने तत्काळ बोर्डी उप वीज कार्यालयाशी संपर्क साधल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.

Web Title: tribal homes destroys because of fallen tree by heavy rain