नवी मुंबई : मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या आरोपीला दिघा परिसरातून अटक केली आहे. सहकाऱ्यासोबत झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्रिभुवन सिंगसह त्याच्या सहकाऱ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये एमआयडीसी परिसरातील व्यावसायिकांना आरटीआय तसेच पीआयएलच्या माध्यमातून धमकावून खंडणी उकळण्याचे सत्र सुरू केले होते.