TRP गैरव्यवहार प्रकरणः पार्थ दासगुप्ताला अर्णब गोस्वामींनी दिले लाखो रुपये?

अनिश पाटील
Monday, 28 December 2020

पार्थ दासगुप्ता यांना रिपब्लिक टीव्हेचे अर्णब गोस्वामी यांनी लाखो रुपये दिल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

मुंबईः  ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पार्थ दासगुप्ता यांना रिपब्लिक टीव्हेचे अर्णब गोस्वामी यांनी लाखो रुपये दिल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. एक महागडे घड्याळ आणि सुमारे साडे तीन किलोचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच बीएसआरसीचे माजी सीईओ दासगुप्ता यांना अटक केली होती. ही  याप्रकरणी 15 आरोपींना अटक होती. आरोपी पार्थ दासगुप्ता हे बीएआरसी या कंपनीत मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी रिपब्लिक भारत हिंदी न्यूज चॅनेल आणि रिपब्लिक टीव्ही इंग्रजी न्यूज या चॅनल्सच्या टीआरपीमध्ये बेकायदेशीर मार्गाने फेरफार करून टीआरपी वाढवला. यावेळीअर्णब गोस्वामी तसेच अन्य संबंधित आरोपींशी अन्यायाचे संगनमत करुन हा प्रकार करण्यात आला आहे. 

बेकायदेशीर मार्गाने फेरफार करून त्यांचा टीआरपी वाढवला आणि त्याबदल्यात अर्णब गोस्वामी यांनी आरोपी पार्थ दासगुप्ता यास वेळोवेळी लाखो रूपये दिले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या पैशातून पार्थ दासगुप्ता यांनी काही किंमती वस्तू आणि दागिने विकत घेतल्या हे सर्व त्यांच्या राहत्या घरातून आढळून आले आहे. याबाबत चौकशीत दासगुप्ता यांनी सांगितल्यानंतर त्यांच्या घरातून 1 मनगटी घडयाळ आणि  सिल्वर रंगाच्या धातूचे 3 किलो 300 ग्रॅम वजनाचे  दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. न्यायालयापुढे सादर केलेल्या अहवालातही पोलिसांनी ही गोष्ट नमूद केली आहे.

बीएआरसी ही संस्था भारतीय माहीती आणि प्रसारण मंत्रालय (एमआयबी) तसेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( ट्राय) यांच्या अधिपत्याखाली काम करते.  या संस्थेने संपूर्ण भारतातील विविध ठिकाणी जवळपास 3 हजार बोरोमिटर्स बसवले असून त्याद्वारे प्रेक्षकांनी पाहिलेल्या पाहिलेल्या कार्यक्रमांवर निगराणी ठेवली जाते आणि त्याद्वारे विविध चॅनेल्सना रेटींग दिले जाते.

हेही वाचा- कंपाऊंडरऐवजी डॉक्टरकडून औषधे घ्या वैफल्यग्रस्त मनस्थिती ठीक करा, भाजपचा राऊतांना टोला

बीएआरसीने दिलेल्या रेटिंग्जनुसार जाहिरातदार जाहिरात प्रसारित करणाऱ्यांना पैसे देतात. टीआरपीमध्ये फेरफार करून फसवणूक केल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम लक्ष केलेल्या चॅनेल्सना होतो आणि अशा प्रकारे फेरफार करून टीआरपी वाढवल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. याप्रकरणी तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम 409, 420, 465, 468, 406, 120(ब), 201, 204, 212 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल होता. आतापर्यंत याप्रकरणी 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने नुकतीच आरोपपत्र दाखल केले होते.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

TRP case Mumbai Police claimed paid lakhs Arnab Goswami Parth Dasgupta


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TRP case Mumbai Police claimed paid lakhs Arnab Goswami Parth Dasgupta