
मधुमेहाचा त्रास वाढल्याने बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईः मधुमेहाचा त्रास वाढल्याने बीएआरसीचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टीआरपी गैरव्यवहाराप्रकरणी विशेष तपास पथकाने त्यांना अटक केली होती. न्यायालयीन कोठडी झाल्यामुळे सध्या ते तळोजा रुग्णालयात होते. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
दासगुप्ता यांना कृत्रिम प्राणवायू देण्यात येत असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी अचानक त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले. दासगुप्ता यांच्या मुलीने सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांना खुले पत्र लिहून त्यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या 14 तासांनंतर कुटुंबियांना कळवण्यात आल्याचे सांगितले आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
माझ्या आईला पहाटे तीनच्या सुमारास याबाबत कळवण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी एवढा उशीरापर्यंत कुटुंबातील कोणताही सदस्य उपस्थित का नाही, असे डॉक्टरांनी कुटुंबियांना विचारल्याचा आरोप या खुल्या पत्रात करण्यात आला आहे. त्यांच्याकडे आमच्या कुटुंबियांचा क्रमांक नव्हता. त्यामुळे माझे वडील शुद्धीत येण्याची वाट पाहत होते. वडिलांबाबत कारागृहाला अनेक ई-मेल करण्यात आले आहेत. त्याच्या शेवटी कुटुंबियांचा मोबाईल क्रमांकही देण्यात आल्याचे तिने नमुद केले आहे. माझ्या वडिलांना मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच स्पोन्डीलेसिससारखे गंभीर आजार आहेत. त्यामुळे कुटुंबियांकडून वारंवार तिच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत विचारणा करण्यात आल्याचा आरोप तिने केला. दरम्यान, तळोजा कारागृहातील डॉक्टरांकडून त्याची नियमित तपासणी करण्या येत होती. तसेच अधिकारी त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा- भिवंडीतील सोनाळे गावात दोन गटात हाणामारी; निवडणुकीदरम्यान प्रकार
--------------------------
(संपादन- पूजा विचारे)
TRP Scam Former BARC CEO Partho Dasgupta critical condition hospitalized