खंडाळा घाटात ट्रकला अपघात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

खंडाळा घाटातील शिंग्रोबाच्या पुढील तीव्र वळणावर माल भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन उलटला.

मुंबई : खंडाळा घाटातील शिंग्रोबाच्या पुढील तीव्र वळणावर माल भरलेला ट्रक अनियंत्रित होऊन उलटला. झाडामुळे ट्रक खोल दरीत जाण्यावाचून राहिला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. 

खंडाळा घाटात विविध वळणांवर अशी मोठी झाडे नियमित देवदूताची भूमिका पार पाडून मोठ्या दुर्घटना थांबवित आहेत. गुरुवारी रात्रीही झाडामुळे ट्रक वाचला. उलटलेला ट्रक झाडावर अडकला नसता तर २५० फूट दरीत कोसळला असता; मात्र ट्रक उलटून येथील झाडाला अडकल्याने कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती होताच महामार्ग वाहतूक पोलिस भास्कर खाडे व अन्य दोघांनी मदत केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Truck Accident in Khandala Ghat