MP Shrikant Shinde : संपामुळे पेट्रोल तुटवडा झाल्यामुळे तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून उचलले जाणार पाऊल

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच चर्चा झाली आहे.
MP Shrikant Shinde
MP Shrikant Shindesakal

डोंबिवली - केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच चर्चा झाली आहे. राज्य सरकार केंद्रासोबत चर्चा करून त्यातून समन्वय साधून योग्य तो तोडगा काढला जाईल अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

इंधन टँकर चालकांसंदर्भात केंद्राने घातलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ टँकर चालकांनी संप पुकारला आहे. या पुकारलेल्या संपामध्ये टँकरचालक सहभागी झाल्याने राज्यात होणारा इंधनपुरवठा सोमवार पासून ठप्प झाला आहे. ठाणे जिल्ह्यात देखील अनेक पेट्रोल पंप दुपारीच बंद करण्यात आले आहेत.

याविषयी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत थोड्या वेळापूर्वी चर्चा केली आहे. शिंदे यांचे केंद्रासोबत बोलणे सुरू आहे. आम्ही देखील त्याठिकाणी पाठपुरावा करू.

हा संप लवकरात लवकर कसा मिटेल आणि त्यातून मार्ग कसा निघेल हे पहिले जाईल. कारण जर इंधनचा पुरवठा झाला नाही तर यामुळे मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर राज्य सरकार केंद्रासोबत योग्य समन्वय साधून मार्ग काढला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com