esakal | ट्रम्प म्हणतात, "मी एक नंबर तर, मोदी दोन नंबर..."; जाणून घ्या किस्सा
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रम्प म्हणतात, "मी एक नंबर तर, मोदी दोन नंबर..."; जाणून घ्या किस्सा

ट्रम्प म्हणतात, "मी एक नंबर तर, मोदी दोन नंबर..."; जाणून घ्या किस्सा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प २४-२५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प दिल्लीत आणि गुजरातमध्ये भेटी देणार आहेत. या संदर्भात ट्रम्प यांनी एक ट्विट करत भारतात जाणे हे ट्रम्प यांच्यासाठी सन्मानाचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र हे ट्विट करत असताना त्यांनी फेसबुक संदर्भातील जी आकडेवारी ट्विट केली आहे त्यावरून नेटकरी देखील अचंबित झालेत. 

मोठी बातमी - उद्धव ठाकरेंच्या 'या' निर्णयामुळे अनेक मंत्री नाराज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प भारतात येत असल्याने "मला आनंद होतोय. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या मैत्रीसाठी ट्रम्प यांचा दौरा विशेष असणार आहे. भारत आपल्या पाहुण्यांचं उत्तम स्वागत करेल", असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. 

काय म्हणालेत डोनाल्ड ट्रम्प : 

Great honor, I think? Mark Zuckerberg recently stated that “Donald J. Trump is Number 1 on Facebook. Number 2 is Prime Minister Modi of India.” Actually, I am going to India in two weeks. Looking forward to it!

— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 14, 2020

मी दोन आठवड्यात भारत दौऱ्यावर जाणार आहे. माझ्या मते मार्क झुकरबर्ग यानं नुकतंच म्हटलंय की फेसबुकवर डोनाल्ड ट्रम्प १ नंबरवर तर भारताचे नरेंद्र मोदी नंबर २ वर आहेत. मी भारत दौऱ्यासाठी उत्सुक आहे, असं ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटलंय.   

मोठी बातमी -  पाण्याची बाटली सोबत ठेवा, टोपी घाला, गॉगल लावा.. कारण मुंबई पेटलीये !

आकडेवारी पहिली तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फेसबुकवर तब्ब्ल ४४ मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे २७ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या बोलण्याप्रमाणे कोणत्या आधारे हे ट्विट केलं याबाबत आता नेटकरी विचारणा करतायत. 

trump says i am number one on facebook and second is narendra modi quotes mark zukerburg