नवी मुंबईत बाळाच्या विक्रीचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

नवी मुंबई - दहा दिवसांच्या बाळाची तीन लाख रुपयांमध्ये विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी सापळा लावून अटक केली. माजिद अब्दुल अजिद शेख (वय २७), रईस हजरत काझी (२६), नगीना बेगम युसुफ खान (२८) आणि मंजुशा तिलक खाटोडा (२३) अशी आरोपींची नावे आहेत.

न्यायालयाने त्यांना २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ठाणे-बेलापूर मार्गालगत खैरणे येथे एक टोळी नवजात बाळाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून चौघांना गजाआड केले. पोलिसांचे एक पथक बेंगलोरला रवाना झाले आहे.

Web Title: Trying to sell the baby in Navi Mumbai crime