

FDA Action In Diwali
ESakal
मुंबई : दिवाळीच्या मिठाई आणि फराळासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाच्या साठवणुकीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, भिवंडी आणि वसई परिसरातून खवा, मावा, काजू, बदाम, पामोलीन तेलासह मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.