फडणवीस यांचे लाडके तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत

प्रशांत बारसिंग
Tuesday, 21 January 2020

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके अधीकारी तुकाराम मुंडे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे  नागपूर मनपात तुकाराम मुंढेंची आयुक्तपदी बदली करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दणका दिल्याचे मानण्यात येते.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंढे यांना नवी मुंबई आणि नाशिक महापालिकात नियुक्ती केली होती. नवी मुंबईत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीला त्यांनी चांगलेच हैराण केले होते. मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. आता नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. याआधी या पदावर अभिजित बांगर काम करत होते.

मोठी बातमी :  मला 'नाईट लाईफ' हे शब्दच आवडत नाही - उद्धव ठाकरे

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. महाविकासआघाडीचे नवीन सरकार आल्यानंतर त्यांनी नागपूरचा गड असलेल्या पालिकेत तुकाराम मुंढेंची बदली केली आहे. मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे येत्या काळात ही बाब भाजपसाठी अडचणीची ठरणार आहे.

येत्या दोन वर्षात नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंढे यांची आयुक्तपदी बदली करण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे भाजपची सत्ता असलेल्या मनपात तुकाराम मुंढेंना मुद्दाम आणलं का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Tukaram mundhe will take charge as commissiioner of nagpur municioal corporation 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tukaram mundhe will take charge as commissiioner of nagpur municioal corporation