

Turbhe Flyover Closed
ESakal
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील तुर्भे रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था जीर्ण आणि धोकादायक झाल्याने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी ठाण्याकडून तुर्भेमार्गे वाशी आणि मुंबईकडे जाणारा उड्डाणपुलाचा मार्ग २५ नोव्हेंबरपासून ३१ मार्च २०२७ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.