esakal | तो सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवायचा आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

तो सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवायचा आणि...

इतर मुले मुली निघून गेल्यानंतर अतिरिक्त ट्युशन देण्याच्या बहाण्याने त्याने तिला थांबवून घेतले.

तो सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवायचा आणि...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : दरदिवशी महिलांवर अत्याचाराच्या नवीन घटना समोर येत असून यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अशीच एक घटना खांदेश्वर भागात घडली असून 15 वर्षीय मुलीवर तिची शिकवणी घेणाऱ्या शिक्षकानेच अत्याचार केला आहे.

मोलकरणीशी शारिरीक लगट करायला गेला आणि...

ही घटना 2015 मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत घडली होती. खांदेश्वर भागात राहणारी 15 वर्षीय मुलगी ही ट्युशन घेण्यासाठी तिच्याच भागातील रहिवाशी असणाऱ्या आरोपी अक्षय पाटील याच्या घरी जात होती. अक्षय हा आपल्या घरामध्ये अनेक मुला-मुलींना घेऊन खाजगी शिकवणी घेत होता. दरम्यान त्यापैकीच एक असलेली पीडित मुलगी देखील त्याच्या ट्युशनमध्ये जात होती.

जानेवारी 2015 मध्ये आरोपी अक्षय याने पीडित मुलीला अतिरिक्त ट्युशन देण्याच्या बहाण्याने इतर मुले मुली निघून गेल्यानंतर थांबवून घेतले  आणि तिच्यावर बलात्कार केला होता. धक्कादायक म्हणजे त्याने पीडित मुलीच्या अजाणतेपणाचा फायदा उचलत सतत सहा महिने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.त्यानंतर मात्र पीडितेने संबधित प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर तिच्या घरच्यांनी तात्काळ खांदेश्वर पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अक्षय पाटील याच्यावर बलात्कारासह पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली होती.

वाचा - हायप्रोफाईल वैश्याव्यवसायाबद्दल पोलिसांचा 'हा' निर्णय

त्यानंतर सुरू असलेल्या खटल्यात पीडित मुलीची साक्ष महत्वाची ठरली. ज्यानंतर आज अलिबाग सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश व्ही.एम.मोहिते यांनी आरोपी अक्षय पाटील याला 10 वर्षे सक्त मजुरीची तसेच 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

web title : tution teacher raped his student

loading image