
मुंबई : आंदोलकांना आवरा अन्यथा आंदोलनाचे वार्तांकन करणार नाही, अशा आशयाचे पत्र रविवारी टीव्ही जर्नालिस्ट असोसिएशनने रविवारी मनोज जरांगे यांना दिले. शनिवारी एका पत्रकार महिलेसोबत आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असभ्य वर्तन केले तर एका व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत धक्काबुक्की करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर असोसिएशनने ही भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.