वसईत २७ हजार चौरसफुटाचे बांधकाम जमीनदोस्त | Vasai - virar municipal corporation | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Construction demolish

वसईत २७ हजार चौरसफुटाचे बांधकाम जमीनदोस्त

वसई : महापालिकेने (Vasai virar Municipal corporation) कामण, चिंचोटी, ससूनवघर, जूचंद्र याठिकाणी केलेल्या बेकायदा बांधकामावर (illegal construction) कारवाई सुरू केली आहे. वसई-विरार पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने एकूण २७ हजार ७५० चौरस फुटांचे बांधकाम जमीनदोस्त (construction demolish) केले आहे. त्यामुळे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा: नवी मुंबई : एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूहल्ला; फरार झालेला आरोपी अटकेत

वसई-विरार पालिकेचे आयुक्त अनिलकुमार व अतिरिक्त आयुक्त आशीष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समिती सहायक आयुक्त नीलम निजााई, कनिष्ठ अभियंता कौस्तुभ तामोरे, विजय नडगे यांनी बांधकामाच्या ठिकाणी यंत्रणेसह जाऊन कारवाई केली आहे.

कामण बेलकडी येथे १५ हजार चौरस फूट औद्योगिक गाळ्यांचे बांधकाम, चिंचोटी येथील दोन हजार ४०० चौरस फुटांवरील एकूण आठ खोल्या, तसेच ससूनवघर भागातील दोन खोल्या व अन्य बांधकाम, तर नायगाव जूचंद्र येथे आठ खोल्या व बाजूला अद्याप बांधकाम अशा एकूण २७ हजार चौरस फुटांच्या बांधकामांवर पालिकेने हातोडा मारला आहे.

Web Title: Twenty Seven Thousand Square Foot Construction Demolish In Vasai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..