
ठाणे - कसारा महामार्गावरील 22 ठिकाणं येणार CCTV च्या निगराणीखाली
ठाणे : महामार्गावरील वाढत्या गुन्हेगारीला आळा (criminal cases) घालण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या पुढाकाराने प्रथमच महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे (cctv camera) बसवण्यात येणार आहेत. ठाणे ग्रामीण पोलीसांच्या (thane police) हद्दीत येणाऱ्या ठाणे कसारा महामार्गावरील 22 ठिकाणं या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार असून गृह विभागानेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शिंदे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या फंडातून 2 कोटी 55 लाख रुपयांची तरतुदींला मंजुरी दिली आहे.
हेही वाचा: ठाण्यात ११३ कोटींची पाणीपट्टी वसुली; स्मार्ट मीटर वादाच्या भोवऱ्यात
ठाणे ग्रामीण पोलीस पट्ट्यात बाहेरून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. ठाणे ग्रामीण हा भाग मुंबईपासून जवळच असल्याने तडीपार झालेले अनेक गुंड या भागात आसरा घेतात. याशिवाय या भागात महामार्गाचे जाळे देखील विस्तृत असल्याने होणाऱ्या अपघातांची संख्या देखील मोठी आहे. अशात ठाणे-कसारा दरम्यान महामार्गावर तसेच घाटात होणाऱ्या दरोड्याचा घटना, चोऱ्या, अपप्रकार, चोरीच्या वाहनांची होणारी वाहतूक, घाटात आणि निर्जन ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा उद्देशाने मृतदेह फेकून देणे अथवा त्यांची विल्हेवाट लावणे यासारखे अनेक प्रकार घडतात.
या गैरप्रकाराना आळा घालण्यासाठी हा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्याची मागणी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी केलेली होती. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या फंडातुन 2 कोटी 55 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार राज्याच्या गृह विभागाने हे सीसीटीव्ही बसवण्याच्या मागणीला मंजुरी दिलेली आहे.
हेही वाचा: मनोर : विवाह्यबाह्य संबंधातून पतीची हत्या; पत्नीला अटक
हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर त्याचा मोठा फायदा इथे होणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी, तसेच या भागाची निगराणी राखण्यासाठी देखील होणार आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे कॅमेरे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे ठाणे शहराप्रमाणेच ठाणे ग्रामीणचा भागात घडणाऱ्या घटनांवर पोलिसांना बारीक नजर ठेवता येणे शक्य होईल.
या निर्णयाच्या अनुषंगाने कारवाई करताना शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी आणि हे कॅमेरे आणि सीसीटीव्ही कंट्रोल रुम लवकरात लवकर तयार करावी असे निर्देश ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षकांना देण्यात आले आहेत.
Web Title: Twenty Two Places Of Thane Kasara Highway Will Be Under Cctv Surveillance Thane News Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..