
Mumbai Pune: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत व खंडाळा येथे शुक्रवारी (ता. २०) दोन वेगवेगळे अपघात झाले. सकाळी साडेसातच्या सुमारास कामशेत येथे झालेल्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाला असून, एकजण जखमी झाला आहे. खंडाळा येथे अपघाताची घटना दुपारी तीन वाजता घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे.
कामशेत येथील अपघातात मृणाली दत्तात्रेय ठाकूर (वय २०, रा. गोळीबार मैदान, पेण, रायगड) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर प्रफुल्ल भाऊ म्हात्रे (वय २८, रा. साई, पेण, रायगड) हे गंभीर जखमी झाले आहेत.